Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केला साडीतला फोटो, ग्लॅमरस अदांनी चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:55 IST

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde)ला खूप लोकप्रियता मिळाली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा(Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे आणि या मालिकेतील कलाकारांनीदेखील रसिकांना आपलेसे केले आहे. या मालिकेत दीपाने आपल्या प्रेमळ स्वभावाने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. यात दीपाची भूमिका रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने साकारली आहे. रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते आणि ती फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

रेश्मा शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून फोटो आणि रिल शेअर करत असते. नुकताच तिने साडीतला फोटो शेअर केला आहे. यात ती निळ्या रंगाच्या साडीत दिसते आहे. साडीवर तिने ऑक्साइडचे दागिने घातले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर कोण विश्वास ठेवणार? रेश्मा शिंदेच्या या साडीतल्या फोटोला चाहत्यांची खूपच पसंती मिळते आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

रंग माझा वेगळा मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या प्रेग्नेंट श्वेताची काळजी घेण्यासाठी दीपा ईनामदारांच्या घरी येते आहे. त्यामुळे त्या घरात सर्वजण खुश आहेत. फक्त श्वेता आणि कार्तिकला हे आवडले नाही. तर दुसरीकडे कार्तिकीलादेखील दीपा तिथे गेलेली आवडले नाही. कारण कार्तिकीला वाटते आहे की कार्तिकमुळे तिचे वडील त्यांना सोडून गेले आणि ते बर्बाद झाले. त्यामुळे कार्तिकी कार्तिकसोबतही नीट बोलत नाही आहे. हे दीपिकाला आवडत नाही. पण शेवटी कार्तिकी दीपिकाला सांगते की, तुझ्या वडिलांमुळे माझे वडील मला आणि आईला सोडून गेले. त्यांनी आम्हाला बर्बाद केले. आता पुढे काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :रेश्मा शिंदे