Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोटींच्या कर्जाचं टेन्शन, भाचीच्या लग्नात राजपाल यादव पोळ्या लाटताना दिसला; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:47 IST

लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगाबाहेर आला

लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगाबाहेर आला. दिल्ली कोर्टाने त्याला अंतरिम जामीन दिला आहे. बाहेर येताच राजपाल भाचीच्या लग्नात सामील झाला. काल तो लग्नात सलमानच्या गाण्यावर थिरकताना दिसला. तर आता आज त्याचा पोळ्या लाटतानाचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. डोक्यावर कोटींचं कर्जाचं ओझं विसरुन तो भाचीच्या लग्नात धमाल करत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अभिनेता राजपाल यादव खऱ्या आयुष्यात किती साधा सरळ आहे याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सध्या तो त्याच्या गावी जाऊन एकदम देसी लूकमध्ये दिसत आहे. भाचीच्या लग्नात पोळ्या लाटतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'पोळी लाटणं एक कला आहे' असंही तो म्हणताना दिसतोय. त्याच्यासोबत गावातील इतर लोकही पोळ्या लाटताना दिसत आहेत. भाचीच्या लग्नात तोही कामात हातभार लावत आहे. कुर्ता-धोती असे साधेच कपडे त्याने परिधान केले आहेत. याच आउटफिटमध्ये त्याचा डान्स करतानाचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. पत्नीसोबत त्याने गणेश पूजा केल्याचाही व्हिडीओ आला होता. 

राजपालच्या या व्हिडीओनंतर चाहते त्याच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. तर कोणी फॅमिली मॅन म्हणून त्याची वाहवाही करत आहेत. भाचीच्या लग्नासाठीच राजपालला तातडीने जामीन हवा होता. म्हणून त्याच्या वकिलांचीही खटपट सुरु होती. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी राजपालला मदत केल्याचंही समोर आलं.  

राजपाल यादवला अंतरिम जामीन मिळाला असला तरी १८ मार्च रोजी पुढील सुनावणी आहे. तोवरच तो तुरुंगाच्या बाहेर असणार आहे. चेक बाउन्सप्रकरणी राजपाल तुरुंगात होता. २०१२ साली आलेल्या 'अता पता लापता' सिनेमाचं त्याने दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा चांगलाच आपटला होता. त्यामुळे राजपालला प्रोडक्शन कंपनीला भरपाई द्यावी लागणार होती. त्याच्या ५ कोटींचं कर्ज होतं. चेक बाउन्स होऊ कर्ज फेडू न शिकल्याने ही रक्कम व्याजासकट ९ कोटींवर पोहोचली. आता नुकतंच राजपालला अडीच कोटी भरावे लागले आणि त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला. याप्रकरणी पुढे काय होणार हे १८ मार्च रोजी कळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav, burdened by debt, seen making chapatis at niece's wedding.

Web Summary : Actor Rajpal Yadav, recently out on bail, joyfully attended his niece's wedding. He was seen dancing and making chapatis, seemingly setting aside his financial troubles. Despite owing crores, Yadav actively participated in the wedding festivities in simple attire, winning hearts with his down-to-earth nature.
टॅग्स :राजपाल यादवबॉलिवूडव्हायरल व्हिडिओ