Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजकुमार होणार रावडी! 'स्त्री २' नंतर अभिनेत्याच्या वाढदिवशी आगामी सिनेमाची शानदार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 13:30 IST

राजकुमार रावचा स्त्री २ सध्या चांगलाच गाजतोय. अशातच राजकुमारच्या वाढदिवशी त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय (rajkumar rao, maalik, stree 2)

'स्त्री २' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगलं यश मिळवलं आहे. 'स्त्री २' नंतर राजकुमार रावच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झालीय. आज राजकुमार रावचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने 'स्त्री २' फेम राजकुमार रावच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. या सिनेमाचं पहिलं पोस्टर काल रिलीज झालं होतं. यामध्ये राजकुमारचा चेहरा दिसला नव्हता. पण आज राजकुमार रावच्या वाढदिवशी 'मालिक' सिनेमातील त्याचा खास लूक दाखवण्यात आलाय. 

आजवर कधीही न पाहिलेला राजकुमार

राजकुमारच्या आगामी 'मालिक' सिनेमाची आज त्याच्या वाढदिवशी घोषणा करण्यात आलीय. सिनेमाच्या पोस्टरमध्ये पोलिसांच्या गाडीवर चढून राजकुमारचा खतरनाक अंदाज बघायला मिळतोय. त्याच्या हातात भलीमोठी बंदुक आणि नजरेत अंगार दिसतोय. राजकुमारचा आजवर कधीही न बघितलेला रावडी अंदाज या पोस्टरमध्ये बघायला मिळतोय. 'पैदा नही हुए तो क्या, बन तो सकते है', अशी टॅगलाईन या सिनेमाच्या पोस्टरखाली लिहिलेली दिसतेय. 

'मालिक' सिनेमाविषयी आणखी

राजकुमार राव आपल्याला कधीही मारधाड अॅक्शन सिनेमे करताना दिसला नाही. 'मालिक' सिनेमानिमित्ताने पहिल्यांदाच राजकुमारचा रावडी अंदाज प्रेक्षकांना दिसणार आहे. 'मालिक' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात झाली असून लवकरच सिनेमाची रिलीज डेट आणि इतर माहिती प्रेक्षकांना कळून येईलच. सध्या मात्र बॉलिवूडमध्ये राजकुमार नावाचं वादळ घोंघावतंय. राजकुमार-श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केलीय. 

टॅग्स :राजकुमार रावबॉलिवूड