Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा विकी 'स्त्री' होऊन चंदेरीच्या तरुणांना भुलवतो; राजकुमारने दाखवली 'स्त्री २'मधील cut झालेल्या सीनची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:19 IST

राजकुमार रावने स्त्री २ मधील cut झालेल्या सीनची खास झलक सर्वांसोबत शेअर केलीय (stree 2, rajkumar rao)

राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री २'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात एकापेक्षा एक कलाकारांची फौज आहे. प्रमुख कलाकारच नव्हे तर पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी अशा कलाकारांना सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय. अशातच 'स्त्री २' विषयी एक खास माहिती समोर येतेय. 'स्त्री २' मधील एका uncut सीनची झलक राजकुमारने दाखवली आहे. राजकुमार 'स्त्री' भूमिकेत सिनेमात दिसला असता. पण हा सीन सिनेमातून काढून टाकण्यात आला.

'स्त्री २' मध्ये राजकुमार रावचा cut झालेला लूक

राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री २'मधील एक खास गोष्ट समोर आलीय. राजकुमारने त्याच्या स्त्री लूकमधले दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोत लाल आणि गोल्डन रंगाच्या वनपीसमध्ये राजकुमारने मुलीचा विग परिधान केलाय. राजकुमार या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. राजकुमारने दिग्दर्शक अमर कौशिकसोबत खास पोज दिली आहे. राजकुमारचा हा लूक पाहून त्याच्या चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

राजकुमार रावने uncut लूकमागील कहाणी उलगडली

राजकुमारने हा लूक शेअर करुन त्यामागील कहाणी उलगडली आहे. राजकुमार म्हणतो, "माझा सिनेमातला आवडत्या सीनपैकी एक सीन. हा सीन सिनेमाच्या फायनल कटमध्ये ठेवण्यात आला नाही. तुम्हाला हा सीन बघायला आवडेल का? मला सर्वांनी सांगा" असं कॅप्शन देऊन राजकुमारने या uncut सीनमागील कहाणी सर्वांसमोर उलगडली  आहे. राजकुमार रावचा हा सीन 'स्त्री २' जेव्हा ओटीटीवर येईल तेव्हा बघायला मिळेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

टॅग्स :राजकुमार रावश्रद्धा कपूरबॉलिवूड