Join us

गुडन्यूज! बॉलिवूड कपल लग्नानंतर ४ वर्षांनी होणार आईबाबा, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:40 IST

कियारा अडवाणीनंतर आणखी एका अभिनेत्रीने दिली गुडन्यूज!

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी गेल्या काही वर्षात गुडन्यूज दिली आहे. इलियाना डिक्रुज दुसऱ्यांदा आई झाली. तर कियारा अडवाणी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. गौहर खाननेही काही दिवसांपूर्वी गुडन्यूज दिली. ती देखील दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. अभिनेता वरुण धवनही काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला. त्यातच आता बॉलिवूडमधल्या एका लोकप्रिय कपलने गुडन्यूज दिली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे.

राजकुमार राव (Rajkumar Rao)  आणि पत्रलेखा (Patralekha)  बॉलिवूडमधलं क्युट कपल आहे. 'सिटीलाईट' या गाजलेल्या सिनेमात ही जोडी दिसली होती. स्क्रीनवर सोबत दिसल्यानंतर ते रिअल लाईफमध्येही प्रेमात पडले. तर आता राजकुमार रावने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच दोघं आईबाबा होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने 'बेबी ऑन द वे' असं लिहिलं आहे. Elated असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे.

राजकुमारच्या या पोस्टवर फराह खानने कमेंट केली आहे. 'अखेर न्यूज सांगितली. माझ्यासाठी ही बातमी लपवणं फार अवघड होत होतं.'. वरुण धवन, दिया मिर्झा, भूमी पेडणेकर, नुसरत भरुचासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत राजकुमार आणि पत्रलेखाचं अभिनंदन केलं आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर ४ वर्षांनी पत्रलेखाने गुडन्यूज दिली आहे.  

टॅग्स :राजकुमार रावपत्रलेखाबॉलिवूड