Join us

बिल्ला नंबर १४२१! रजनीकांतच्या नवीन सिनेमाची शानदार घोषणा, थलायवाचा पहिला लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:55 IST

सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी सिनेमाची जबरदस्त घोषणा करण्यात आलीय. सिनेमाबद्दल सविस्तर जाणून घ्या (rajinikanth)

सुपरस्टार रजनीकांत यांच्या वयाची साठी उलटली असली तरीही आजही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. रजनीकांत यांचे सिनेमे म्हणजे पैसा वसूल मनोरंजनाची गॅरंटी हे प्रेक्षक गृहीत धरतात. रजनीकांत यांचा काही महिन्यांपूर्वी आलेला 'जेलर' सिनेमा प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरला. नुकतीच रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. 'कूली' असं या सिनेमाचं नाव असून रजनीकांत यांचा दमदार लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

'कूली' सिनेमातील रजनीकांत यांचा लूक व्हायरल

रजनीकांत यांचा 'कूली' सिनेमातील पहिला लूक समोर आलाय. सिनेमाचं ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर रिलीज झालं असून रजनीकांत यांच्या हातात १४२१ नंबरचा बिल्ला दिसत आहे. रजनीकांत त्यांच्या धारदार नजरेने या बिल्ल्याकडे पाहत आहेत. 'कूली' सिनेमात रजनीकांत देवा ही भूमिका साकारणार आहेत. रजनीकांत यांंचा लूक रिविल होताच चाहत्यांनी या लूकला चांगली पसंती दिली आहे.

'कूली' सिनेमात दिसणार दिग्गज कलाकार

रजनीकांत यांच्या 'कूली' सिनेमात दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत नागार्जूना, श्रृती हसन हे कलाकार झळकणार आहेत. याशिवाय या सिनेमात 'मंजूमल बॉईज' फेम सोबिन शाहीर हा अभिनेताही दिसणार आहे. लोकेश कनगराज  यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. लोकेश यांनी याआधी 'विक्रम' आणि 'लिओ' हे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. त्यामुळे 'कूली' हा सिनेमाही या युनिव्हर्सचा भाग आहे का, हे सिनेमा आल्यावरच कळेल.

टॅग्स :रजनीकांतTollywoodनागार्जुन