Join us
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांत यांना पडली 'धुरंधर 2' ची भुरळ, आदित्य धरला म्हटलं 'बॉक्स ऑफिसचा बाप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 08:46 IST

Rajinikanth: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रजनीकांत यांनी ट्विटरवर 'धुरंधर'साठी एक पोस्ट लिहिली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा (ranveer singh) 'धुरंधर: द रिवेंज' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घालत आहे. सर्व स्तरांमधून या सिनेमाचं कौतुक होतांना दिसत आहे. कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनीदेखील या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे या कौतुक सोहळ्यात दाक्षिणात्य कलाकारही मागे नाहीत. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (rajinikanth) यांनी सुद्धा धुरंधरचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रजनीकांत यांनी ट्विटरवर 'धुरंधर'साठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सिनेमासोबतच दिग्दर्शक आदित्य धर यांचीही प्रशंसा केली आहे. ''धुरंधर 2 काय सिनेमा आहे. आदित्य धर, तू तर बॉक्स ऑफिसचा बाप आहेस. रणवीर, सिनेमातील कलाकार आणि सगळ्या क्रू मेंबरचं मनापासून अभिनंदन. प्रत्येक भारतीयाने पाहावा असा हा सिनेमा आहे. जय हिंद'', असं ट्विट रजनीकांत यांनी केलं आहे.

रजनीकांत यांनी केलेल्या ट्विटवर आदित्य धरनेदेखील रिप्लाय देत त्यांचे आभार मानले आहेत. ''सर, आपण मनोरंजनला फक्त एक बेंचमार्क मानतो. कित्येक दशकांपासून तुम्हीच आम्हाला शिट्टी वाजवणं, हसवणं, रडवणं, आयुष्याला फील करणं हे सगळं शिकवलं. आजही त्याच अंदाजात आणि नजाकततेने तुम्ही हे सगळं करताय. आणि, अशामध्येच तुम्ही जर धुरंधर 2 ला पाहण्याजोगा सिनेमा म्हणत असाल तर खरोखरच हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा सुपरस्टार क्षण आहे. ज्या व्यक्तीने आम्हाला मोठं व्हायचं स्वप्न दाखवलं त्या व्यक्तीने आशीर्वाद दिल्यासारखं आहे. आभार व्यक्त करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतायेत. तुमचे हे शब्द माझ्या मनाला खरोखरच खूप भावले आहेत. जय हिंद'', असा रिप्लाय आदित्यने रजनीकांत यांना दिला.

दरम्यान, आदित्यचा धुरंधर २ हा सिनेमा १९ मार्च रोजी रिलीज झाला. या सिनेमाने प्रीव्ह्यू शोमधून ४३ कोटींची कमाई केली. तर अवघ्या पाच दिवसात या सिनेमाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे या सिनेमाने पुष्पा २, केजीएफ २ या सिनेमांनाही धोबीपछाड केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajinikanth Impressed by 'Dhurandhar 2,' Calls Director 'Box Office King'

Web Summary : Superstar Rajinikanth praised Ranveer Singh's 'Dhurandhar: The Revenge' and director Aditya Dhar, calling Dhar the 'box office king.' He congratulated the cast and crew, urging all Indians to watch the film, which has surpassed 500 crore in five days.
टॅग्स :धुरंधर सिनेमारजनीकांतरणवीर सिंगबॉलिवूडसिनेमा