Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गन्स अँड गुलाब'चा दुसरा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 16:49 IST

प्रसिद्ध दिग्दर्शक राज आणि डीके यांनी 'गन्स अँड गुलाब'च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे.

अभिनेता राजकुमार राव हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. राजकुमार राव आणि दुल्कर सलमान यांची क्राइम कॉमेडी वेबसिरीज  'गन्स अँड गुलाब' चांगलीच गाजली. ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता त्याचा दुसरा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक राज आणि डीके यांनी 'गन्स अँड गुलाब'च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.  कॅप्शनमध्ये लिहिले, 'रिकाम्या हाताने नाही तर आम्ही 'गन्स अँड गुलाब'  नवा सीझन घेऊन आलो आहोत...'. राजकुमार राव, राज आणि डीकेची टीम पुन्हा एकत्र काम करणार आहे. मात्र, वेबसिरीजचा दुसरा सीझन कधी रिलीज होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

राजकुमार रावची 'गन्स अँड गुलाब' ही क्राईम ड्रामा वेबसिरीज आहे. 1990 च्या दशकातील गुलाब गंज नावाच्या शहराभोवती या वेबसिरीजची कथा फिरते. वेबसिरीजमध्ये ९० च्या दशकातील गाणी आहेत. जर तुम्ही अद्याप या वेबसिरीजचा पहिला सीझन पाहिला नसेल तो नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. 'गन्स अँड गुलाब'च्या दुसऱ्या सीझनची घोषणा झाल्यानंतर चाहते या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर राजकुमार राव 'स्त्री 2' हा चित्रपटातून लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :राजकुमार रावसेलिब्रिटीबॉलिवूडनेटफ्लिक्स