Join us

'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील टप्पूनं सोडली मालिका?,भिडे मास्तर म्हणाले- बरेच दिवस शूटसाठी आलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 18:32 IST

Taarak mehta ka ooltah chashmahनट्टू काकांची एन्ट्री होताच टप्पूने या मालिकेला रामराम केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (taarak mehta ka ooltah chashmah) ही मालिका चर्चेत येत आहे. जवळपास १४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतून अनेक कलाकारांनी काढता पाय घेतला आहे. तर, काही कलाकारांची नव्याने एन्ट्री होत आहे. यामध्येच तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलश लोढा यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एका कलाकाराने मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

मालिकते नुकतीच नव्या नट्टू काकांची एंट्री झाली आहे. 'तारक मेहता'च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर असित मोदी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रेक्षकांना नव्या नट्टू काकांची ओळख करुन दिली असून  ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं. परंतु, नट्टू काकांची एन्ट्री होताच  टप्पू या मालिकेला रामराम केला आहे.

रिपोर्टनुसार 'टप्पू'ची भूमिका साकारणारा राज अनडकट ही मालिका सोडली आहे. भव्य गांधींच्या जाण्यानंतर 2017 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये राजची एंट्री झाली होती. गेल्या काही दिवसांपासून तो शोच्या सेटवर दिसत नाहीये. त्यामुळेच त्यांच्या जाण्याच्या बातम्या येत आहेत.

शोमध्ये 'भिडे'ची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर याने राज अनाडकट यांच्या जाण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. पिंकविलाशी बोलताना तो म्हणाला, "एक कलाकार म्हणून त्याने शो सोडला आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. पण त्याला काही तब्येतीची समस्या होती, त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून शोचे शूटिंग करत नाहीये. मी त्याला सेटवर बघितलं नाही."

राज सध्या  बहीण आणि आईसोबत दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करतोय. तो त्याच्या ट्रिपचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही राजने तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण तो कुठेही गेला नाही आणि शोमध्ये राहिला

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार