Join us

​राधिका मदनची होतेय बॉलिवूड एन्ट्री, इंडस्ट्रीला मिळणार का नवा ‘पटाखा’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 15:00 IST

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट येत आहेत. अनेक चित्रपटांचे ट्रेलर आणि पोस्टर लोकांना बघायला मिळत आहेत. लवकरच बॉलिवूडचा आणखी एक नवा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘पटाखा’.

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट येत आहेत. अनेक चित्रपटांचे ट्रेलर आणि पोस्टर लोकांना बघायला मिळत आहेत. लवकरच बॉलिवूडचा आणखी एक नवा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘पटाखा’. होय, विशाल भारद्वाज यांच्या या चित्रपटाद्वारे टीव्ही अभिनेत्री राधिका मदन बॉलिवूड डेब्यू करतेय. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी झाला. यात राधिका मदत बीडी ओढताना दिसतेय.राधिका या चित्रपटात एका गावातील मुलीची भूमिका साकारताना दिसतेय. ‘पटाखा’च्या पोस्टरमध्ये दोन बहिणी दिसत आहेत. यावरून हा चित्रपट दोन बहिणींची कथा असल्याचे भासते़. राधिकाच्या बहिणीची ही भूमिका ‘दंगल’ फेम सान्या मल्होत्रा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेता सुनील ग्रोव्हर याची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे कळते. पण तूर्तास केवळ राधिकाचे लूक समोर आले आहे. सान्याचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. त्याअर्थाने तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. पण राधिकाचा हा डेब्यू सिनेमा आहे. छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर ती एन्ट्री घेते आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्या भावी भविष्यासाठी अनेकार्थाने महत्त्वाचा आहे. येत्या २८ सप्टेंबरला रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसादचं राधिकाचे भविष्य ठरवणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच.

राधिकाचा बॉलिवूडशी कुठलाही संबंध नाही. म्हणजेचं, तिने अतिशय संघर्षाने स्वबळावर अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.  ‘छुरियां’ हा चित्रपटही राधिकाला याच मेहनतीच्या जोरावर मिळाला. या चित्रपटासाठी ६० मुलींचे आॅडिशन घेतले गेले होते. यातून राधिकाची निवड झाली. आपल्या प्रतिभेच्या जोरावर राधिकाने ही भूमिका आपल्या खिशात टाकली. विशाल भारद्वाज हे सुद्धा राधिकाची प्रतिभा पाहून चांगलेच प्रभावित झालेत. आम्हाला या भूमिकेसाठी जशी अभिनेत्री हवी होती, राधिका एकदम तशीच आहे. या भूमिकेच्या चौकटीत ती अगदी फिट बसते, असे ते म्हणाले