Join us

RaanBaazaar : "आणि जो scene माझ्या कारर्किदीतला...", प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 13:51 IST

सध्या प्राजक्ता तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.

अभिनेत्री प्राजक्ता माळी(prajakta mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकत आहे. सध्या प्राजक्ता तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच आता प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने आपल्या कारर्किदीतला बेस्ट सीन्सबाबत सांगितलं आहे. 

सोशल मीडियावर प्राजक्ता माळी सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रीेपैकी एक आहे. रानबाजारमधील फोट शेअर करत प्राजक्ताने लिहिले,  आणि जो scene माझ्या कारर्किदीतला one of the best scene आहे (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो scene असलेला episode काल प्रदर्शित झाला… प्राजक्ताची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. प्राजू खरंच खूप उत्तम अभिनय तु या वेबसिरीजमध्ये केलंय, उच्च दर्जाचा अभिनय आहे तूझा आणि खूप उत्तम वेब सिरीज, तुझ्या अभिनयाला तोड नाही प्राजक्ता एकदम जबरदस्त अशा कमेंट्स तिच्या या पोस्टवर चाहते करतायेत. 

दरम्यान, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये झळकले आहेत. अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी अक्षय बर्दापूरकर, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन यांनी केली आहे. 

टॅग्स :रानबाजार वेबसीरिजप्राजक्ता माळी