Join us

'पुष्पा ३' कन्फर्म! 'पुष्पा २'साठी करावी लागली ३ वर्षांची प्रतीक्षा, तर तिसरा भाग या वर्षात येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:11 IST

'पुष्पा २' (Pushpa 2) पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठं सरप्राइज मिळाले, ते म्हणजे या चित्रपटाचा तिसरा सीक्वल म्हणजेच 'पुष्पा ३' (Pushpa 3) भेटीला येणार आहे.

'बाहुबली' आणि 'केजीएफ' हे असे दोन पॅन इंडिया सिनेमे आहेत, ज्यांची क्रेझ लोकांमध्ये खूप पाहायला मिळते. मात्र २०२१ साली सुकुमार (Director Sukumar) दिग्दर्शित एका चित्रपटाने रसिकांना एवढं वेड लावलं की, गेल्या ३ वर्षांपासून या चित्रपटाच्या सीक्वलची चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. हा चित्रपट दुसरा तिसरा नसून 'पुष्पा २' (Pushpa 2) आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. पुष्पा २ पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठं सरप्राइज मिळाले, ते म्हणजे या चित्रपटाचा तिसरा सीक्वल म्हणजेच 'पुष्पा ३' (Pushpa 3) भेटीला येणार आहे. मात्र आता प्रेक्षकांना हा प्रश्न पडला आहे की, 'पुष्पा २' साठी लोकांना ३ वर्ष वाट पाहावी लागली तर आता तिसऱ्या सीक्वलसाठी किती प्रतीक्षा करावी लागेल.

'पुष्पा' फ्रंचाइजी खूप काळ चालणार आहे, याची हिंट सिनेप्रेमींना मिळाली आहे. दिग्दर्शक सुकुमार यांनी ही सीरिज सुरू ठेवण्याची प्लानिंग केलीय. त्यांचे म्हणणे आहे की, पुष्पा राजच्या चरित्रसोबत कथेत बरेच भाग लोकांसमोर आणता येऊ शकतात. पुष्पा २ द रुल रिलीज झाला आहे पण पुष्पाराजचा प्रवास इथेच संपलेला नाही.

'पुष्पा ३'चं 'हे' असेल टायटलपुष्पा २चा शेवट तिसऱ्या सीक्वलच्या इंट्रोडक्शनने होतो. यातून कन्फर्म होते की, तिसरा भाग येणार आहे. तिसऱ्या सीक्वलचं शीर्षक असणार आहे पुष्पा द रॅम्पेज. हा तिसरा भाग येण्यासाठी दुसऱ्या सीक्वलपेक्षा जास्त वेळ लागणार आहे.

'पुष्पा ३' आधी अल्लू अर्जुन पूर्ण करणार २ प्रोजेक्ट्सग्रेटआंध्रच्या रिपोर्टनुसार, पुष्पा सीरिजमध्ये परतण्याआधी अल्लू अर्जुनला दोन प्रोजेक्ट्स पूर्ण करणार आहे, ज्यात त्रिविक्रमचा समावेश आहे.

'पुष्पा ३'मध्ये विजय देवरकोंडाची एंट्रीयादरम्यान सुकुमार राम चरणच्या एका नव्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. पुष्पा ३च्या प्रोडक्शनला सुरू होण्यासाठी कमीत कमी ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. पुष्पा द रॅम्पेजची शूटिंग २०२८ किंवा २०२९मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे की, तिसऱ्या सीक्वलमध्ये विजय देवरकोंडा अल्लू अर्जुनसोबत झळकणार आहे. २०२२मध्ये अर्जुन रेड्डी स्टार विजय देवरकोंडाने ट्विट करत पुष्पाचे तीन भाग येणार असल्याचा उल्लेख केला होता. तिन्ही सिनेमांची नावं सांगितली होती 'पुष्पा-द राइज', 'पुष्पा-द रूल' आणि 'पुष्पा-द रॅम्पेज'.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाविजय देवरकोंडा