Join us
Daily Top 2Weekly Top 5

काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:50 IST

'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये दिसलेला या अभिनेत्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. कोण आहे हा अभिनेता? (pushpa 2)

'पुष्पा २' सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. रविवारी 'पुष्पा २'चा ट्रेलर रिलीज झाला. सिनेमाचा ट्रेलरने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातलाय. 'पुष्पा २'च्या ट्रेलरने अल्पावधीत मिलियनच्या घरात व्ह्यूज मिळवले आहेत. 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. अशातच 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये अवघ्या काही सेकंदासाठी झळकलेला एक चेहरा लक्ष वेधून घेतोय. जाणून घ्या त्याविषयी.

कोण आहे हा अभिनेता जो भाव खाऊन गेला

'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये डोकं अर्ध टक्कल केलेलं, अर्धी दाढी अन् चेहरा रंगवलेला, गळ्यात चपलांचा हार घातलेल्या या अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधलं. या भूमिकेचा वेगळा लूक आणि अभिनय सध्या चर्चेत आहे. तारक पोनप्पा असं या अभिनेत्याचं नाव असून तारकने गेल्या अनेक वर्षांपासून साऊथ इंडस्ट्रीत छोट्या-मोठ्या भूमिकेत अभिनय करताना दिसतोय. तारक पोनप्पाच्या व्यक्तिरेखेची 'पुष्पा २'मध्ये नवी एन्ट्री होणार आहे. तारकला याआधी आपण 'देवरा' सिनेमात अभिनय करताना पाहिलंय.

'पुष्पा २' अवघ्या काहीच दिवसात होणार रिलीज

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाची भूमिका असणारा 'पुष्पा २' सिनेमा अवघ्या काहीच दिवसात रिलीज होणार आहे. ५ डिसेंबर २०२४ ला 'पुष्पा २' जगभरात प्रदर्शित होतोय. 'पुष्पा २' पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत. पुन्हा एकदा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने 'पुष्पा २'साठी हिंदी डबिंग केलंय. या सिनेमात पहिल्या भागात झळकलेला अभिनेता फहाद फासिल पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पुष्पाला भिडताना दिसणार आहे.

 

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पारश्मिका मंदाना