Join us
Daily Top 2Weekly Top 5

२० मिनिटांचं नवीन फूटेज असलेला 'पुष्पा २' सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज; मेकर्सने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:59 IST

'पुष्पा २'चं रिलोडेड व्हर्जन आता थिएटरमध्ये रिलीज होणार असून प्रेक्षकांना नवीन फूटेज बघायला मिळणार आहेत (pushpa 2)

'पुष्पा २' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली.  डिसेंबरमध्ये रिलीज झालेला 'पुष्पा २' अजूनही थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे. 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा केली. सिनेमाने आतापर्यंत ५०० कोटींहून अधिकची कमाई केली. 'पुष्पा २' सिनेमा थिएटरमधून नवीन वर्षात काढण्यात येईल असं वातावरण असताना 'पुष्पा २'च्या मेकर्सने कमाई आणखी वाढवण्याची तगडी उपाययोजना केलीय. सिनेमामध्ये आणखी २० मिनिटं समाविष्ट करुन 'पुष्पा २' नवीन फूटेजसह पुन्हा रिलीज करण्यात येतोय.

'पुष्पा २' नवीन फूटेजसह या दिवशी होणार रिलीज

'पुष्पा २' च्या मेकर्सने काल एक खास घोषणा केली. यामध्ये आणखी २० मिनिटांचं नवीन फूटेज समाविष्ट करण्यात येणार आहे. 'पुष्पा २'चं हे नवीन रिलोडेड व्हर्जन ११ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. त्यामुळे 'पुष्पा २'च्या चाहत्यांना चांगलीच पर्वणी मिळणार आहे. त्यामुळे ३ तास २० मिनिटांचा असणारा 'पुष्पा २' सिनेमा आता ३ तास ४० मिनिटांचा होणार आहे. 'पुष्पा २' ज्यांना आवडला ते प्रेक्षक २० मिनिटांचं नवं व्हर्जन पाहायला थिएटर पुन्हा हाउसफुल्ल करतील, यात शंका नाही.

'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिस कमाई

'पुष्पा २'च्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल सांगायचं तर, या सिनेमाने आतापर्यंत ७७५ कोटींची कमाई केलीय. 'पुष्पा २' गेले ३४ दिवस लोकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरु आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फाहद फासिल यांनी प्रमुख भूमिका साकारली. ५ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमाची २०२४ मध्ये प्रचंड चर्चा होती. याचाच परिणाम सिनेमाच्या लोकप्रियतेवर आणि कमाईवरही झाला. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना