Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:54 IST

'पुष्पा 2'मधील फहाद फासिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे

'पुष्पा 2'ची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. अवघ्या काहीच तासांत म्हणजे उद्या (५ डिसेंबरला) सिनेमा रिलीज होणार आहे. 'पुष्पा 2'ची गेल्या काही महिन्यांत जबरजस्त क्रेझ बघायला मिळाली. सिनेमातील प्रमुख कलाकार म्हणजे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना. या दोघांशिवाय सिनेमातील आणखी एका कलाकाराची चर्चा आहे ती म्हणजे 'भंवर सिंग शेखावत'ची भूमिका साकारणारा अभिनेता फहाद फासिल. फहाद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याविषयीची अपडेट समोर आलीय.

फहाद इम्तियाज अलीच्या सिनेमातून करणार बॉलिवूड डेब्यू

फहाद फासिल हा साउथमधील प्रसिद्ध अभिनेता. 'जोजी', 'आवेशम', 'कुंबलंगी नाईट्स' असे फहादचे अनेक सिनेमे गाजले आहेत. पिपिंगमूनने दिलेल्या रिपोर्टनुसार फहाद आता साउथ सिनेमे गाजवून बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. इम्तियाज अलीच्या आगामी रोमँटिक सिनेमात फहाद झळकणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात फहादसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकणार आहे. त्यामुळे फहाद-तृप्ती या वेगळ्या जोडीचा बॉलिवूड रोमान्स बघायला सर्व उत्सुक असतील.

फहादने पुष्पा गाजवला, आता पुष्पा 2 ची उत्सुकता

फहादने २०२१ साली आलेल्या 'पुष्पा' सिनेमात आयपीएस भंवर सिंग शेखावतची भूमिका साकारली. सिनेमाच्या शेवटच्या अर्ध्या तासात आलेल्या फहादने उत्कृष्ट अभिनय करुन सर्वांचं प्रेम मिळवलं. आता फहाद 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनसमोर मुख्य खलनायक म्हणून उभा राहतोय. ट्रेलरमध्ये दिसलेला फहादचा अभिनय लक्षवेधी ठरला. त्यामुळे आता सिनेमात फहाद काय कमाल दाखवतो, हे उद्या सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल.

 

टॅग्स :तृप्ती डिमरीअल्लू अर्जुनपुष्पारश्मिका मंदाना