Join us

'पुष्पा २'चा नवा वाद! मेकर्सने घेतला मोठा निर्णय; सिनेमातील गाणं हटवलं; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:13 IST

'पुष्पा २'चे वाद संपता संपत नाहीत! आता निर्मात्यांनी सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे आता मेकर्सने महत्वाचा निर्णय घेतलाय (pushpa 2)

'पुष्पा २' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलंच मन जिंकलंय. 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. भारतीय सिनेसृष्टीत सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून 'पुष्पा २'ला ओळखलं जातंय. अशातच 'पुष्पा २'च्या रिलीज आधीपासूनच सिनेमाविषयीचे वाद थांबता थांबत नाहीयेत. अशातच 'पुष्पा २' विषयी नवा वाद ओढवला असून निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय.

'पुष्पा २'च्या मेकर्सने गाणं हटवलं

विषय असा आहे की, 'पुष्पा २'मध्ये चाहत्यांच्या मागणीचा मान राखून 'दमुन्ते पट्टुकोरा' हे गाणं रिलीज करण्यात आलं. या गाण्यात 'अगर तुममें हिम्मत है, तो मुझे पकड लो, शेखावत!' हे शब्द आहेत. एकूणच सिनेमात पुष्पा पोलीस ऑफिसर असलेल्या भंवर सिंग शेखावतला आव्हान द्यायला हे शब्द वापरतो. त्यामुळे या गाण्यावर काही लोकांनी आक्षेप घेतलाय.  संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमेतवर मेकर्स प्रश्नचिन्ह उमटवत आहेत, असा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे होत असलेला विरोध लक्षात घेता मेकर्सने हे गाणं युट्यूबवरुन डिलीट केलं आहे.

'पुष्पा २' आतापर्यंतचे वाद

'पुष्पा २' सिनेमाचा विषय जितका गाजला तितकेच सिनेमाने वादही ओढवून घेतले. 'पुष्पा २'च्या प्रिमियरच्या दिवशी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याशिवाय त्या महिलेचा छोटा मुलगा सध्या हॉस्पिटलमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे अल्लू अर्जुनवर गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक झाली. काही दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी अल्लू अर्जुनच्या घरावर टोमॅटोचा हल्ला केला. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना