Join us

Pushpa 2: 'पुष्पा २'च्या मेकर्सला मोठा धक्का, रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला अल्लू अर्जुनचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:31 IST

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा २' अखेर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पण, प्रदर्शित होताच 'पुष्पा २'च्या मेकर्सला मात्र मोठा धक्का बसला आहे. 

Pushpa 2 : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा २' अखेर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणाऱ्या पुष्पासाठी चाहत्यांना तब्बल चार महिने आणखी वाट पाहावी लागली. काही कारणांमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेला पुष्पा अखेर आज (५ डिसेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला. पण, प्रदर्शित होताच 'पुष्पा २'च्या मेकर्सला मात्र मोठा धक्का बसला आहे. 

'पुष्पा २'च्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रदर्शनाआधीच 'पुष्पा २'ने अॅडव्हान्स बुकिंगमधून बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या आसपास कमाई केली. मात्र थिएटरमध्ये रिलीज होताच 'पुष्पा २' ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे 'पुष्पा २'च्या निर्मात्यांना जबर धक्का बसला आहे. फिल्मीझिला, तमिळ रॉकर्स, तमिळ योगी, तमिळ ब्लास्टर्स, मुव्हीरुल्झ यांसारख्या प्लॅटफॉर्म आणि काही पायरसी वेबसाईटवर अल्लू अर्जुनचा सिनेमा लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांची चिंता वाढली आहे. 

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' या सिनेमाचा 'पुष्पा २' हा सीक्वल आहे. 'पुष्पा २ : द रुल' हा सिनेमा तेलुगु, हिंदी, मल्याळम, तमिळ आणि कन्नज अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. 2D, 3D आणि IMAX व्हर्जनमध्ये हा सिनेमा रिलीज केला गेला आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फवाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत.  'पुष्पा २' पहिल्याच दिवशी ३०० कोटींच्या कमाईचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनरश्मिका मंदानापुष्पा