Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हमको आजकल है...' गाण्यावर थिरकली पूर्वा शिंदे, अदांनी माधुरी दीक्षितलाही दिली टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 10:43 IST

Purva Shinde : अभिनेत्री पूर्वा शिंदे बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. त्यामुळे ती बऱ्याचदा चर्चेतदेखील येताना दिसते. दरम्यान आता तिने माधुरी दीक्षितचं लोकप्रिय गाणं हमको आजकल है या गाण्यावर डान्स केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे (Purva Shinde). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'लागीरं झालं जी' मालिकेत 'जयडी'ची भूमिका साकारून ती घराघरात लोकप्रिय झाली आहे. सध्या ती पारु या झी मराठीवरील मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. पूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तिथे ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतेच तिने माधुरी दीक्षितच्या हमको आजकल है या गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या डान्समधील अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. 

अभिनेत्री पूर्वा शिंदे बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. त्यामुळे ती बऱ्याचदा चर्चेतदेखील येताना दिसते. दरम्यान आता तिने माधुरी दीक्षितचं लोकप्रिय गाणं हमको आजकल है या गाण्यावर डान्स केला आहे. तिने माधुरी दीक्षित प्रमाणेच गेटअप केला आहे. तिने पिंक रंगाची नववारी साडी नेसली असून त्यावर कंबरपट्टा घातला आहे. नाकात नथ आणि केस मोकळे सोडले आहेत. या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

पूर्वा शिंदेने या गाण्यावर खूप छान स्टेप्स, अदा आणि हावभाव केले आहेत. त्यामुळे तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. ते तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. तिचे चाहते पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करताना दिसत आहेत. एकाने खऱ्या गाण्यापेक्षा हे खूप चांगले झाले आहे, असे लिहिले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, मला तुमचा डान्स आवडतो. अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने म्हटले अगं माझी माधुरी. 

वर्कफ्रंटसध्या पूर्वा झी मराठीवरील 'पारू' या मालिकेत दिशा ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे. तिने 'लागीरं झालं जी' या मालिकेत जयडी ही ग्रे शेड भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. याशिवाय तिने 'जीव माझा गुंतला' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. या मालिकेत तिने श्वेता हे पात्र साकारलं होतं

टॅग्स :पूर्वा शिंदेमाधुरी दिक्षित