Join us

VIDEO : लग्नानंतर रेमो डिसुजाला बघण्यासाठी पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचला पुनीत पाठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 14:02 IST

लग्नानंतर पुनीत पाठक पत्नीसोबत रेमोला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजाला हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये भरती करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची तब्येत आता हळूहळू बरी होत आहे. अशात लग्नानंतर पुनीत पाठक पत्नीसोबत रेमोला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात बघता येऊ शकतं की, पुनीत पाठक हॉस्पिटलच्या बाल्कनीमध्ये रेमोची पत्नी लिजेल डिसुजासोबत बोलत आहे.

पुनीत पाठक आणि निधिचा हा व्हिडीओ विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर दोघांचेही फॅन्स वेगवेगळ्या रिअ‍ॅक्शन देत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुनीत पाठकने गर्लफ्रेन्ड निधिसोबत लग्न केलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रेमो डिसुजाने अनेक सिनेमांची कोरिओग्राफी करण्यासोबतच काही सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात १९९५ मध्ये केली होती. २००० साली 'दिल पे मत ले यार' सिनेमासाठी त्याने कोरिओग्राफी केली होती. त्यानंतर तो इंडस्ट्रीतील टॉप कोरिओग्राफरपैकी एक झाला. त्यानंतर त्याने 'फ्लाइंग जट', 'रेस 3', 'फालतू', 'एबीसीडी', 'एबीसीडी 2' आणि 'स्ट्रीट डांसर'सारख्या सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे.  

टॅग्स :पुनित पाठकबॉलिवूडसोशल व्हायरल