कन्नड कलाविश्वातील (Kannada Cinema) प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते अतिदक्षता विभागात असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. पुनीत यांना रुग्णालयात दाखल केल्याचं समजताच चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. इतकंच नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांनीही पुनीत यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
२९ ऑक्टोबर रोजी पुनीत यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, हा त्रास हृदयविकाराचा असल्याचं सांगत डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात हलविलं. विशेष म्हणजे पुनीत यांच्या प्रकृती अस्वास्थाची माहिती मिळताच चाहते हवालदिल झाले असून अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, सध्या ट्विटवर पुनीत राजकुमार ट्रेंड होऊ लागले आहेत. यामध्येच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही रुग्णालयात जात पुनीत यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचं सांगण्यात येत आहे.
कोण आहे पुनीत राजकुमार?
पुनीत राजकुमार हे दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध आणि मोठं नाव आहे. कन्नड चित्रपटांमध्ये त्यांचा दबदबा असून त्यांनी २९ पेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिले आहे. प्रसिद्ध अभिनेता राजकुमार आणि Parvathamma यांचा तो मुलगा आहे. पुनीत यांनी बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ‘Bettada Hoovu’ असं त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. इतकंच नाही तर त्यांना कर्नाटक राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
२००२ पासून पुनीत झाले सुपरस्टारपुनीत यांना अप्पू या नावाने ओळखलं जातं. २००२ मध्ये त्यांना ही ओळख मिळाली. ‘अभी’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि ‘अनजनी पुत्र’ यांसारख्या चित्रपटात ते झळकले आहेत.‘Yuvarathnaa’ या चित्रपटात ते अखेरचे झळकले असून याच वर्षी त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
puneeth rajkumar admitted in hospital after suffers heart attack health updates