Join us
Daily Top 2Weekly Top 5

उधारी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचा बॉलिवूडचा 'हा' हँडसम अभिनेता, आईने केली होती चप्पलने धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 11:52 IST

अभिनेता म्हणाला, जेव्हा त्याच्याकडे पैसे नसायचे तेव्हा तो दुकानदाराकडून उधारी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचा.

अभिनेता पुलकित सम्राट हा बॉलिवूड हँडसम अभिनेत्यांपैकी एक स्टार आहे. चित्रपटांमधील त्याचे काम प्रेक्षकांना आवडते. पुलकितने सांगितले की, शाळा आणि कॉलेजच्या काळात बऱ्याच मुली त्याच्यावर फिदा असायच्या. शाळेच्या दिवसात जेव्हा त्याच्याकडे पैसे नसायचे तेव्हा तो दुकानातून उधारीवर गिफ्ट घेऊन गर्लफ्रेंडला द्यायचा. एक दिवस पुलकितच्या आईला ही गोष्ट कळली आणि त्याची आईने पिटाई केली.

 बॉम्बे टाईम्सशी बोलताना पुलकित म्हणाला, शाळेच्या दिवसांपासून मला बऱ्याच मुली प्रपोज करायचा. त्यात माझ्या सिनिअर्सचा सुद्धा समावेश होता. एकदा त्याच्या आईने त्याला खूप मारले होते, कसे ते हे पुलकितने सांगितले.  तो म्हणाला, "जेव्हा मी सातवीत शिकत होतो, त्यावेळी माझी एक गर्लफ्रेंड होती.  मी माझ्या पॉकेट मनीमधून पैसे वाचवायचो आणि व्हॅलेंटाईन डे वर तिला गिफ्ट द्यायचो. जेव्हा कमी पैसे असायचे, तेव्हा मी उधारीवर गिफ्ट घ्यायचो."

एक दिवस मला वाटलं की आज सर्व कर्ज फेडले पाहिजे.  दुर्दैवाने त्याच दिवशी दुकानदार माझ्या घरी पोहोचला आणि त्याने सर्व काही आईला सांगितले. मी शाळेतून घरी पोहोचलो तेव्हा बघितलं तो दुकानदार माझ्या आईसोबत उभा होता. शप्पथ घेऊन सांगतो त्यादिवशी आईने माझी चप्पलेने धुलाई केली होती.

 

पुलकित सध्या अभिनेत्री कृति खरबंदाला डेट करतो आहे. गेल्या वर्षी बातमी आली होती की पुलकित आणि कृती खरबंदा लवकरच लग्न करणार आहेत.  लॉकडाऊनमध्ये दोघांनी एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंट केला. या दोघांनी 'वीर की वेडिंग' आणि 'पागलपंती' सिनेमात एकत्र काम केले आहे. सोशल मीडियावर दोघे एकमेकांना सोबतचे फोटो पोस्ट करत असतात. 

टॅग्स :पागलपंतीकृति खरबंदा