Join us
Daily Top 2Weekly Top 5

जावई माझा भला! परंपरा मोडीत सासू - सासऱ्यांसाठी पुलकितने बनवला खास पदार्थ, क्रितीकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 13:51 IST

पुलकितने क्रितीच्या घरी अर्थात सासरी स्वयंपाक करुन सर्व पुरुषांसाठी एक आदर्श निर्माण केलाय. क्रितीनेही त्याचं कौतुक केलंय. वाचा सविस्तर

काहीच दिवसांपुर्वी अभिनेता पुलकित सम्राटने अभिनेत्री क्रिती खरबंदासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. दोघं गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर क्रितीने पुलकितच्या घरी एक गोड हलवा तयार केला हे आम्ही तुम्हाला सांगितलंच. आता क्रितीनंतर पुलकितने सासरच्या लोकांसाठी खास पदार्थ तयार केलाय.

लग्नानंतर 'पहिली रसोई' बनवणं ही वधूसाठी परंपरा आहे. क्रितीने काहीच दिवसांपुर्वी ही परंपरा फॉलो करत सासरी गोड हलवा तयार करुन सर्वांना खाऊ घातला. आता विशेष म्हणजे पुलकितने सुद्धा ही परंपरा जतन केलीय. पुलकित-क्रिती नुकतंच बंगळुरुला गेले. यावेळी पुलकितने सर्व पुरुषांसाठी एक आदर्श निर्माण केला. लग्नानंतर स्त्रियांनी फॉलो करण्याची 'पहिली रसोई' परंपरा पुलकितने फॉलो केली. आणि त्याने क्रितीच्या आई - बाबांसाठी अन् सासरच्यांसाठी खास पदार्थ बनवला.

पुलकितचे फोटो क्रितीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो शेअर करत क्रितीने नवऱ्याचं खुप कौतुक केलंय. जी परंपरा मुली फॉलो करतात ती पुलकितने केली म्हणून क्रिती नवऱ्यावर खुप खुश झाली. पुलकितने सासरी गेल्यावर सर्वांसाठी गोड हलवा तयार केला. सध्या पुलकितवर फक्त क्रिती आणि तिच्या घरचेच नाही तर नेटकरीही कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :कृति खरबंदालग्न