Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुलकित सम्राटने जंगलात केले न्यूड फोटोशूट, रिचा चड्ढा म्हणाली ‘रियली नंगू’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 16:48 IST

अभिनेता पुलकित सम्राट त्याच्या एका ताज्या पोस्टमुळे चर्चेत आहे. होय, पुलकितने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर न्यूड फोटो शेअर केला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

ठळक मुद्देसध्या पुलकीत त्याच्या आगामी ‘तैश’ सिनेमाच्याच चित्रीकरणात बिझी आहे.

अभिनेता पुलकित सम्राट त्याच्या एका ताज्या पोस्टमुळे चर्चेत आहे. होय, पुलकितने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर न्यूड फोटो शेअर केला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.या फोटोत पुलकित जंगलात जमिनीवर लेटलेला आहे. यादरम्यान त्याच्या शरीरावर केवळ एक टॉवेल आहे. ‘हॅलो फ्रायडे’ असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे.पुलकितच्या या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड कलाकारही यात मागे नाहीत.  अभिनेत्री रिचा चड्ढाने ‘रियली नंगू’ अशी कमेंट केली आहे तर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने डोळे बंद करणारे इमोजी टाकले आहे.   अभिनेता विष्णू विशालने ‘जंगल में नंगल’ अशी कमेंट केली.  

सोशल मीडिया युजर्सनी त्याला सुपरहॉट म्हटले आहे. अर्थात काहींनी त्याच्यावर टीकाही केली आहे.  तुला काही लाज नाही का असा प्रश्न अनेकांनी कमेंटमध्ये त्याला विचारला आहे. सध्या पुलकितचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सध्या सिनेमांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. सलमान खानची बहीण श्वेता रोहिरासोबत झालेल्या पुलकितच्या घटस्फोटाचे कारण यामी गौतम असल्याचे बोलले गेले होते. आता पुलकित पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार पुलकित सम्राट कृति खरबंदाला डेट करतोय. दोघांना अनेकवेळा स्पॉट करण्यात आले आहे.   सध्या पुलकीत त्याच्या आगामी ‘तैश’ सिनेमाच्याच चित्रीकरणात बिझी आहे. याशिवाय ‘पागलपंती’ या चित्रपटातही तो झळकणार आहे.

टॅग्स :रिचा चड्डा