Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन्नाराला माझी गरज नाही...' प्रियंकाने माध्यमांना दिलेलं उत्तर; बहिणींच्या गळाभेटीचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:50 IST

प्रियंकाची चुलत बहीण मन्नारा चोप्रा सध्या बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे.

'ग्लोबल स्टार' प्रियंका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) सध्या बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनेकांना तिचा खेळ पसंतीस पडताना दिसतोय. मन्नारा प्रियंकाची चुलत बहीण असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर होती. यानंतर प्रियंकाने पोस्ट करत मन्नाराला तिच्या बिग बॉसमधील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता प्रियंका आणि मन्नाराचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये दोघी माध्यमांशी संवाद साधत आहेत.

प्रियंका आणि मन्नाराचा हा जुना व्हिडिओ आहे. यामध्ये प्रियंकाला बहिणीला पाठिंबा देण्यासाठी आली आहे. पत्रकार प्रियंकाला विचारतात की,'तू खूप स्ट्रगल केलेस, तुझा कोणी गॉडफादर नव्हता. पण आता मन्नाराला तुझ्यारुपात एक गॉडफादर मिळाली आहे का?' यावर प्रियंका म्हणते,'मी माझ्या पूर्ण कुटुंबासाठी हे सांगेन. मी असेपर्यंत कोणीच त्यांच्याशी पंगा घेऊ शकत नाही. मी जितकी त्यांची मदत करु शकते तितकी नक्कीच करेन. परिणीतीला तिच्या मेहनतीमुळे स्टार झाली आहे आणि मला खात्री आहे की मन्नाराही होईलच. तिला सुद्धा माझी गरज लागणार नाही.'

प्रियंकाने माध्यमांसमोर मन्नाराला पाठिंबा दिला. तसंच दोघीही एकमेकांची गळाभेट घेतानाही दिसल्या. मन्नाराने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. 'रोग','थिक्का','जकन्ना' या सिनेमांमुळे ती लोकप्रिय झाली. सध्या मन्नारा बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राबिग बॉससोशल मीडिया