Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला प्रियांकाच्या न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटचा Review; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:09 IST

Priyanka chopra: बॉलिवूड कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी अलिकडेच प्रियांकाच सोना या रेस्टॉरंटला भेट दिली.

कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासह अन्य अनेक क्षेत्रांमध्येही सक्रीय आहेत. यात कोणी फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे. कोणी व्यावसायिक आहे. तर, काही जण बिझनेसमॅनदेखील आहेत. यामध्येच बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रादेखील (priyanka chopra) मागे नाही. देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी प्रियांका उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक व्यावसायिकदेखील आहे. प्रियांकाचं न्यूयॉर्कमध्ये स्वत:चं रेस्टॉरंट असून बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने या रेस्टॉरंटचा रिव्ह्यू दिला आहे.

बॉलिवूड कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाज (vishal bhardwaj)  यांनी अलिकडेच प्रियांकाच सोना या रेस्टॉरंटला भेट दिली. यावेळी या रेस्टॉरंटमधील भारतीय पदार्थांची चव कशी आहे हे त्यांनी सांगितलं.

‘मित्रांसोबत एक सुंदर रात्र आणि न्यूयॉर्कमध्ये एका ट्विस्टसोबत सर्वात चवदार भारतीय जेवण. #SonaNewYork’ , अशी पोस्ट शेअर करत विशाल भारद्वाज यांनी ट्विटरवर प्रियांकाला टॅग केलं आहे. त्यांच्या या पोस्टवर ‘तुम्हाला हे आवडलं याचा मला आनंद झाला. तुमचं या ठिकाणी कधीही स्वागत आहे,’ असा रिप्लाय प्रियांकाने दिला आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये तिचं स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं. या रेस्टॉरंटमध्ये खासकरुन संपूर्ण भारतीय पदार्थ मिळतात. अगदी पारंपरिकपासून ते चाट पदार्थांपर्यंत अनेक पदार्थांचा यात समावेश आहे. तसंच विशाल भारद्वाज आणि प्रियांका चोप्रा यांनी  ‘कमीने’, ‘७ खून माफ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे या दोघांमध्येही चांगली मैत्री आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राविशाल भारद्वाजबॉलिवूडसेलिब्रिटी