Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:17 IST

Priyanka chopra: प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली असून अनेक जण त्यांना सातत्याने त्यांच्या फॅमेली प्लॅनिंगविषयी प्रश्न विचारत असतात.

देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chpora). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली असून ही जोडी सातत्याने चर्चेत असते. या दोघांच्या लग्नाला आता बराच काळ उलटला असून अनेक जण त्यांना सातत्याने त्यांच्या फॅमेली प्लॅनिंगविषयी प्रश्न विचारत असतात. विशेष म्हणजे  सातत्याने विचारण्यात येणाऱ्या या प्रश्नावर आता प्रियांकाने जाहीररित्या उत्तर दिलं आहे. एका कार्यक्रमात आम्ही बाळाचा विचार करतोय असं तिने सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निक आणि प्रियांका यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांमध्येच प्रियांकाने तिच्या फॅमेली प्लॅनिंगविषयी वक्तव्य करुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अलिकडेच प्रियांकाने ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ या शोमध्ये हजेरी लावली होती. हा कार्यक्रम २३ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात प्रियांकासोबत निक आणि त्याचे भावंडही सहभागी होती. याचवेळी तिने तिच्या फॅमिली प्लॅनिंगविषयी खुलासा केला. विशेष म्हणजे तिचं वक्तव्य ऐकून निकही चक्रावून गेला.

 “जोनस कुटुंबात निक आणि माझी एकमेव अशी जोडी आहे, ज्यांना मूल नाही. म्हणूनच मी आणि निक ही घोषणा करण्यास उत्सुक आहोत की, लवकरच आम्ही गोड बातमी देणार आहोत,” प्रियांकाने या कार्यक्रमात हे वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

पुढे ती म्हणते, “आज रात्री आम्ही दोघंही नशा करून उद्यापर्यंत झोपून राहणार आहोत. दरम्यान, प्रियांकाने हे वक्तव्य केल्यावर निकही चक्रावून गेला. त्यामुळे त्याची झालेली अवस्था पाहून प्रियांका म्हणाली, मी जेव्हा ते बोलले तेव्हा तुझा चेहरा खरोखर बघण्यासारखा होता” ज्यावर निक म्हणाला, “हो, मला थोडी काळजी वाटली.” विशेष म्हणजे प्रियांकाने केलेलं हे वक्तव्य जरी मजेशीर अंदाजात असलं तरीदेखील अनेकांना आता तिच्या प्रेग्नंसीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सोबतच प्रियांकाने खरंच मस्करी केली की हे कोणत्या प्रकारचे संकेत होते, असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासबॉलिवूडसेलिब्रिटी