Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बॉयफ्रेन्ड निकची जंगी प्लॅनिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 14:25 IST

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा 18 जुलैला 36वा वाढदिवस आहे. प्रियंकाचा हा वाढदिवस खास आणि यादगार करण्यासाठी निक जोनस सध्या तयारीत लागला आहे. 

मुंबई : गर्लफ्रेन्डचा वाढदिवस जवळ आला की, बॉयफ्रेन्डची कशी धावपळ होत असेल हे काही वेगळं सांगायला नको. सध्या अशीच धावपळ प्रियंका चोप्राचा बॉयफ्रेन्ड निक जोनस होत आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा 18 जुलैला 36वा वाढदिवस आहे. प्रियंकाचा हा वाढदिवस खास आणि यादगार करण्यासाठी निक जोनस सध्या तयारीत लागला आहे. 

निक जोनसने प्रियंकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक खास जागाही निवडल्याचं समजतंय. प्रियंका आणि निकची वाढत असलेली जवळीच गेल्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र बघण्यात येत आहे. इतकेच काय तर अंबानींच्या पार्टीमध्येही दोघे सोबत गेले होते. आता अशी चर्चा आहे की, निक प्रियंकाचा वाढदिवस चांगला करण्यासाठी खास तयारी करत आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंका आपला 36वा वाढदिवस ग्रीसमध्ये साजरा करणार आहे. असे सांगितले जात आहे की, निक प्रियंकासोबत एका लॉन्ग व्हेकेशनचं अनेक दिवसांपासून प्लॅनिंग करत होता. आता त्याला तिच्या वाढदिवसानिमित्त ही संधी मिळाली आहे. 

निक आणि प्रियंका नुकतेच एकत्र भारत भेटीवर आले होते. यावेळी निकने प्रियंकाच्या परिवारासोबतही वेळ घालवला. दरम्यान या महिन्याच्या शेवटी दोघे साखरपुडा करणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. पण याबाबत दोघांनीही काही अधिकृतपणे सांगितले नाहीये. अशात आता प्रियंकाचा बर्थडे कसा सेलिब्रेट केला जातो आणि त्यावेळी काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासबॉलिवूडसेलिब्रिटी