एका लहान मुलीचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. फोटोत साधीसुधी दिसणारी ही मुलगी लोकप्रिय अभिनेत्री आहे. चष्मा घालून बाईकवर बसलेल्या या मुलीनं बॉलिवूडच्या मोठ्या- मोठ्या अभिनेत्रींना टक्कर दिलेली आहे. एवढेच नाही तर कमाईच्या बाबतीत तिने केवळ अभिनेत्रीच नाही तर अनेक बॉलिवूड अभिनेत्यांंनााही मागं टाकलं आहे. प्रत्येकजण तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतो. तिनं आपलं नाव फक्त भारत नाही तर विदेशातही चमकवलं आहे.
फोटोमध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी ६५० कोटी रुपयांची मालकीण आहे. तिने बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट चित्रपट दिले आणि आता ती परदेशात स्थायिक झाली आहे. तिनं लग्नदेखील एका विदेशी व्यक्तीसोबत केलंय. जर तुम्हाला आता देखील ही अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न पडला असेल, तर ही दुसरी कोणी नसून अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आहे. प्रियंकानं नुकतंच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर बालपणीपासून ते दोस्ताना मियामीच्या शूटिंगपर्यंतचे १५ फोटो शेअर केले आहेत. हा त्यापैकीच एक फोटो (Priyanka Chopra Shares Childhood Photo) आहे.
प्रियंका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. प्रियंका आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच फिटनेस, फिगर आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते. प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायच झालं तर, प्रियंका एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी २९' या चित्रपटात महेश बाबूसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमासाठी तिनं तब्बल ३० कोटी एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे. तथापि, सिनेमाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.