Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राच्या घरचं 'बजेट' बिघडलं; सोडावा लागला अमेरिकेतला आलिशान बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 12:15 IST

प्रियंका आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेतील आलिशान बंगल्यात राहत होती.

Priyanka Chopra Facing Financial Problem: ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्याकडे गडगंज संपत्ती असणार असंच सगळ्यांना वाटेल. अमेरिकन निक जोनससोबत (Nick Jonas) ती सहा वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकली. निक जोनस गायक आहे तर प्रियंकाही हॉलिवूड-बॉलिवूड अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम करते. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, प्रियंका आणि निकला सध्या आर्थिक चणचण भासतेय. त्यांना अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथील आलिशान बंगलाही रिकामा करावा लागला आहे. नक्की झालंय काय वाचा.

2 डिसेंबर 2018 मध्ये प्रियंका आणि निक यांचा राजस्थानमध्ये ग्रँड विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर दोघंही अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे एका आलिशान बंगल्यात राहायला गेले. गेल्या काही वर्षांपासून निक आणि प्रियंका लेक मालती मेरीसह याच घरात राहत होते. घराची किंमत २० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 149 कोटी रुपये आहे. माध्यम रिपोर्टनुसार दोघांनी हे घर रिकामं केलं आहे. काय आहे यामागचं कारण?

Reddit च्या रिपोर्टनुसार, प्रियंका आणि निक आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. ते घरासाठी दरमहा 1 लाख अमेरिकी डॉलर भाडं द्यायचे. मात्र आता त्यांना एवढी मोठी रक्कम देणे शक्य होत नाहीए. यामुळेच त्यांनी घर रिकामं केल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंकाने घरातील फोटो शेअर करणंही बंद केलं होतं. तिने गृहप्रवेशानंतर याच घरात दिवाळीही साजरी केली होती. शिवाय होळीसाठी कुटुंबीय आणि मित्रपरिवाला बोलवले होते. तिची लेक मालती मेरीसोबतचे अनेक क्युट फोटो तिने याच घरातून शेअर केले होते. मात्र आता निक-प्रियंका लेकीसह घरातून शिफ्ट झाले आहेत. अर्थात दोघांकडूनही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

2019 पासूनच प्रियंका-निक घराच्या शोधात होते. 5 जानेवारी 2021 रोजी प्रियंकाने गृप्रवेशाचे फोटो पोस्ट केले होते. तिने पती निकसोबत विधिवत पूजाही केली होती. प्रियंकाचा यावेळी देसी लूकही पाहायला मिळाला होता.  2022 मध्ये मालती मेरीच्या जन्मानंतर तिने लेकीसाठी घर रिनोव्हेटही केलं  होतं.  

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासअमेरिकाहॉलिवूडसुंदर गृहनियोजन