Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, सेटवर झाली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 17:35 IST

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आता क्वांटिकोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. या सीझनचं शूटिंग प्रियंका आयरलंडमध्ये करत होती.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आता क्वांटिकोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. या सीझनचं शूटिंग प्रियंका आयरलंडमध्ये करत होती. याच सेटवरुन प्रियंकाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 

क्वांटिको सीझन 3 च्या शूटिंगवेळी प्रियंकाच्या टोंगळ्याला इजा होऊन जखमी झाली आहे. प्रियंकाने ट्विट करुन स्वत: ही माहिती दिली आहे. त्यामुळे तिला आता 3 आठवडे आराम करावा लागणार आहे. 

क्वांटिकोच्या सीझन 3 चे 13 एपिसोड येणार आहेत. आधीचे दोन्ही सीझन हे चांगलेच गाजले. त्यातील प्रियंकाच्या कामाचही कौतुक करण्यात आलं. आता सर्वांना या नव्या सीझनची उत्सुकता लागली आहे. 

दरम्यान, प्रियंका सलमान खानच्या आगामी भारत या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात काम करण्यासाठी ती उत्सुक असल्याचेही तिने याआधी सांगितले आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड