Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका-निकच्या दिवाळी पार्टीची चर्चा; जेवणाच्या मेन्यूमध्ये 'या' भारतीय पदार्थांना मिळालं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 17:53 IST

Priyanka chopra: प्रियांकाने अमेरिकेत तिच्या घरी दिवाळी पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये तिने भारतीय संस्कृती जपत जेवणामध्ये खास भारतीय पदार्थांचा समावेश केल्याचं पाहायला मिळालं.

दिवाळी हा सण सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकासाठीच खास असतो. त्यामुळे देशात मोठ्या धुमधडाक्यात दिवाळीचं सेलिब्रेशन केलं जातं. विशेष म्हणजे दरवर्षी सेलिब्रिटींच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं जातं. यावर्षीदेखील अनेक सेलिब्रिटींच्या घरी पार्टीचं आयोजन होतं. मात्र, या सगळ्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राची (priyanka chopra) पार्टी सर्वाधिक चर्चेत राहिली. प्रियांकाने अमेरिकेत तिच्या घरी दिवाळी पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये तिने भारतीय संस्कृती जपत जेवणामध्ये खास भारतीय पदार्थांचा समावेश केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रियांकाच्या दिवाळी पार्टीच्या जेवणाचा मेन्यू सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या प्रियांकाने तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिच्या दिवाळी पार्टीच्या फोटोंचाही समावेश आहे. मात्र, या सगळ्या फोटोमध्ये प्रियांकाने पाहुण्यांसाठी जेवणात जो खास मेन्यू ठेवलेला तो चर्चेत आहे. प्रियांकाच्या पाहुण्यांसाठी खूश करण्यासाठी प्रसिद्ध शेफ Sami Udell यांनी भारतीय पदार्थ तयार केले होते. 

Sami Udell यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या जेवणाच्या मेन्यूचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांकाने आयोजित केलेल्या पार्टीत पाहुण्यांच्या जेवणात तिने भटुरे, चकली, लाडू, बर्फी, करंजा यांच्यासह अनेक पारंपरिक भारतीय पदार्थांचा समावेश केल्याचं दिसून येत आहे. 

दरम्यान, Sami Udell आणि प्रियांका यांची पहिली भेट तीन वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हापासून Sami Udell बऱ्याचदा प्रियांकाच्या घरी पार्टी असल्यावर खास पदार्थ तयार करतात. अलिकडेच Sami Udell  यांनी वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाचं कौतुक केलं होतं. प्रियांका अत्यंत प्रेमळ, मेहनती आणि इतरांच्या कामाची कदर करणारी व्यक्ती आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूड