Join us

एका महिन्यात होणार प्रियंका-निकचा साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 16:51 IST

अशात आता अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. प्रियंका आणि तिचा मित्र निक जोनस हे सध्या गोव्यामध्ये एन्जॉय करताहेत. 

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या लग्नांच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात आता अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. प्रियंका आणि तिचा मित्र निक जोनस हे सध्या गोव्यामध्ये एन्जॉय करताहेत. 

प्रियंका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून आपल्याहून 10 वर्षांनी लहान असलेला बॉयफ्रेन्ड निक जोनससोबतच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आहे. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियंका आणि निक हे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करु शकतात. एक अभिनेत्री म्हणून प्रियंकाचं करिअर सध्या चांगलंच सुरक्षित आहे. बॉलिवूडसोबतच ती हॉलिवूडमध्येही आपला डंका वाजवत आहे.

बॉलिवूडच्या आगामी 'भारत' सिनेमात दिसणार आहे. अशात आता प्रियंका लग्नाचं प्लॅनिंग करत आहे. रिपोर्टनुसार, प्रियंकाला निकसोबतच्या नात्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी निक भारतात येऊन प्रियंकाच्या फॅमिलीला भेटल्याचेही बोलले जात आहे. 

21 जून रोजी निक प्रियंकासोबत मुंबईत आला होता. प्रियंकाने या नात्याला केवळ मैत्रीचं नाव दिलंय. पण दोघांची केमिस्ट्री, एकत्र राहणं पाहून दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दोघेही सोशल मीडियात एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड