Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया प्रकाशचा नवा व्हिडीओ व्हायरल, तिचं हे टॅलेंट पाहून अवाक् झाले फॅन्स....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 15:08 IST

प्रियाने तिचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. 'प्रिया' असं तिने या चॅनलचं नाव ठेवलंय.  या चॅनलवरून लोकांना प्रियाचं एक वेगळं टॅलेंट बघायला मिळालं आहे.

अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने आपल्या नजरेच्या इशाऱ्यांनी अनेकांना घायाळ केलं होतं. अनेक महिने तिचा डोळ्यांनी इशारे करणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता. या व्हिडीओमुळे प्रियाला कमालीची लोकप्रियता मिळाली होती. आता ती सिनेमांमध्ये काम करत आहे. इतकेच नाही तर आता प्रिया तिच्या आवाजामुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियाने तिचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. 'प्रिया' असं तिने या चॅनलचं नाव ठेवलंय.  या चॅनलवरून लोकांना प्रियाचं एक वेगळं टॅलेंट बघायला मिळालं आहे. प्रिया प्रकाश वारियरने या चॅनलच्या माध्यमातून तिचं सिंगिंग टॅलेंट लोकांसमोर आणलं आहे.

प्रिया प्रकाश वारियरने यूट्यूबवर तिच्या लेटेस्ट व्हिडीओत 'रंगीला' सिनेमातील उर्मिला मांतोडकरवर चित्रित झालेलं 'हाय रामा ये क्या हुआ' हे गाणं गायलंय. प्रियाचा हा व्हिडीओ तिच्या फॅन्सच्या पसंतीस पडला असून लोक भरभरून कमेंट करत आहेत. तिच्या फॅन्सने तिच्या या टॅलेंटचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, प्रिया प्रकाश वारियरने 'विंक आणि फायर गन' इशाऱ्याने सर्वांना घायाळ केले होते. अनेक मोठ्या सेलिब्रिटींनीही तिचा तो खास व्हिडीओ शेअर केला होता. रातोरात प्रिया या व्हिडीओमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. त्यानंतर तिची लोकप्रियता इतकी की, इन्स्टाग्रामवर तिचे ७० लाखांपेक्षा फॅन फॉलोअर्स आहेत. प्रिया प्रकाश वारियरच्या 'ओरू अदार लव' सिनेमातील तिच्या कामाचंही कौतुक केलं गेलं होतं. याच सिनेमातील तिचा डोळा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रिया आता लवकरच 'श्रीदेवी बंगलो' आणि 'लव हॅकर्स' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार  आहे. 

हे पण वाचा :

प्रिया प्रकाश वारियरचा नवा व्हिडीओ पाहिलात?, ही आहे व्हिडीओची खासियत

अचानक Instagramवरुन गायब झाली होती प्रिया प्रकाश वारियर, आता Video शेअर करत सांगितले कारण

Stunning! वेड लावतील ‘एक्सप्रेशन क्वीन’ प्रिया प्रकाश वारियरच्या अदा, पाहा फोटो

टॅग्स :प्रिया वारियरबॉलिवूडसोशल व्हायरल