Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया प्रकाश वारियरला मिळाले धाडसी चॅलेंज, पाहा व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 21:30 IST

आपल्या ‘विंक स्टाईल’साठी ओळखली जाणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे.

काही महिन्यांपूर्वी एक मुलगी एका रात्रीत स्टार झाली. काही सेंकंदाच्या व्हिडिओने तिला रातोरात स्टार बनवले. तिच्या ‘नैन मटक्का’ने अनेकांना वेड लावले. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते आपल्या ‘विंक स्टाईल’साठी ओळखली जाणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिच्याबद्दल. होय, प्रियाचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे.

हा व्हिडिओ कुठल्या चित्रपटाचा नाही. या व्हिडिओत प्रिया एक विलक्षण धाडस करताना दिसतेय. व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की, प्रिया एका एम्युजमेंट पार्कमध्ये आहे आणि रोलर कोस्टरवर राईड करतेय. रोलर कोस्टर विलक्षण वेगाने वर जातो आधि तशी जोरजोरात किंचाळू लागते आणि शेवटी तिला दिलेले चॅलेंज पूर्ण करते. हा व्हिडिओ पाहून तुम्ही प्रियाच्या पुन्हा प्रेमात पडाल, हे सांगणे नकोच.

ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपनेप्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली होती.   प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

टॅग्स :प्रिया वारियर