प्रिया प्रकाश वारियरचे वाढले भाव! एका जाहिरातीसाठी घेतले एक कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 07:35 PM2018-07-09T19:35:31+5:302018-07-09T19:35:51+5:30

यंदाची सर्वाधिक मोठी इंटरनेट सेन्सेशन म्हणून प्रकाशझोतात आलेली प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

priya prakash varrier signs rs 1 crore deal for national ad | प्रिया प्रकाश वारियरचे वाढले भाव! एका जाहिरातीसाठी घेतले एक कोटी!!

प्रिया प्रकाश वारियरचे वाढले भाव! एका जाहिरातीसाठी घेतले एक कोटी!!

googlenewsNext

यंदाची सर्वाधिक मोठी इंटरनेट सेन्सेशन म्हणून प्रकाशझोतात आलेली प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या विंक स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रियाने एका नॅशनल अ‍ॅड कमर्शिअल शूटसाठी 1 कोटी रूपयांची डिल साईन केली असल्याची खबर आहे.
काही दिवसांपूर्वी प्रिया प्रकाश मुंबईतील एका स्टुडिओत दिसली होती. त्यामागे हेच कारण होते. सूत्रांनी सांगितले की, गत शुक्रवारी सकाळी प्रियाने एका कमर्शिअलचे शूट केले. या शूटबद्दल बरीच गोपनियता बाळगली गेली. कारण ही एक नॅशनल अ‍ॅड होती. या नॅशनल अ‍ॅडसाठी प्रिया प्रकाशने 1 कोटी रूपये घेतल्याचे आम्हाला सांगण्यात आले. कुठल्याही न्यूकमरसाठी ही रक्कम बरीच मोठी म्हणता येईल.
यापूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी प्रिया प्रकाश 8 लाख रूपये घेते, अशी खबर होती. इन्स्टाग्रामवर प्रिया प्रकाशचे 60 लाखांवर फॉलोअर्स आहेत. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर प्रियाने दोन बॉलिवूड चित्रपट साईन केल्याचे कानावर येतेय. यातला एक चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटात प्रिया लीड रोलमध्ये नाही. पण तिची भूमिका चांगलीच महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. प्रियाने साईन केलेला दुसरा चित्रपट कुठला, ते अद्याप गुलदस्त्यात आहे.

ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपनेप्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली होती.   प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

 

 

 

Web Title: priya prakash varrier signs rs 1 crore deal for national ad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.