Join us

माधुरीच्या या ड्रेसची किंमत ? सोशल मीडियावर व्हायरल झालेत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 07:13 IST

धकधक गर्ल माधुरी दीक्षित या वयात सुद्धा तितकीच सुंदर आणि ॲक्टिव्ह आहे

ठळक मुद्देमाधुरी सध्या डान्स दिवाने ३ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. यामध्ये ती सतत सुंदर अशा पोशाखांमध्ये दिसून येते. 

धकधक गर्ल माधुरी दीक्षित या वयात सुद्धा तितकीच सुंदर आणि ॲक्टिव्ह आहे. आजही आपल्या मनमोहक अदांनी ती चाहत्यांना घायाळ करत आहे. माधुरीने नुकताच एक पिंक शरारा ड्रेस परिधान केला होता. या सुंदर जरी सिल्कच्या शरारामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसची किंमत तब्बल ८५ हजार इतकी होती.  

माधुरी या ड्रेसमध्ये जणू अप्सराच दिसत होती. माधुरीचे या ड्रेसवरील फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माधुरी सध्या डान्स दिवाने ३ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. यामध्ये ती सतत सुंदर अशा पोशाखांमध्ये दिसून येते. 

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूड