Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमचे दाराशी आहे शिमगा...! 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर-मुक्ताने माहिम कोळीवाड्यात साजरी केली होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:10 IST

पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसली मुक्ता, तर राजवरही खिळल्या नजरा

'स्टार प्रवाह' वरील लोकप्रिय 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत कोळी कुटुंब दाखवण्यात आलं आहे. काल सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा झाला. मुंबईतील माहिम कोळीवाड्यात तर होळीची धमाल असते. प्रेमाची गोष्ट मालिकेतील सागर-मुक्ता या प्रेक्षकांच्या लाडक्या जोडीने माहिम कोळीवाड्यात जाऊन होळी साजरी केली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यंदा माहिम कोळीवाड्यातील होळी दरवर्षीपेक्षा जास्त उत्साहात साजरी झाली. कारण 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर आणि मुक्ता म्हणजे अभिनेता राज हंचनाळे आणि अभिनेता स्वरदा ठिगळे यांनी माहिम कोळीवाड्यात येत सण साजरा केला. त्यांच्यासोबत छोटी सई सुद्धा आली होती. गुलाबी नऊवारी, केसात गरजा, हातात बांगड्या या पारंपरिक लूकमध्ये स्वरदा सुंदर दिसत होती. राज पिवळ्या कुर्ता पायजमात होता. त्याने डोक्यावर पारंपरिक टोपीही घातली होती. कोळीवाड्यातील महिलांसोबत मनोसक्त नाचत त्यांनी शिमगा साजरा केला. सोबत छोटी सईही पारंपरिक लूकमध्ये आलेली दिसत आहे.  सागर, मुक्ता आणि सईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

स्टार प्रवाह ने सोशल मीडियावर हे व्हिडिओ शेअर केले आहेत. स्वरदा आणि राज पारंपरिक पद्धतीने पूजाही केली.  त्यांच्यासोबत माहिम कोळीवाड्यातील लोकांचाही आनंद द्विगुणित झाला आहे. ऑनस्क्रीन कोळी कुटुंब ऑफस्क्रीनही होळीसाठी पारंपरिक अंदाजात न्हाऊन निघालं आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतामाहीमहोळी 2025राज हंचनाळेमुंबई