Join us
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यांसमोर प्रितीने मारलेली किंग खानच्या थोबाडात, 'कभी अलविदा..'च्या सेटवर घडलेला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:45 IST

Preity zinta: शाहरुखचा कलाविश्वात दरारा पाहायला मिळतो. मात्र, या सुपरस्टारला चक्क प्रिती झिंटाने सर्वांसमोर कानशिलात लगावली होती.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने इंडस्ट्रीत त्याची खास जागा निर्माण केली आहे. जवळपास ३० वर्षांपेक्षाही जास्त काळ त्याने इंडस्ट्रीत घालवली आहेत. त्यामुळे आज तो कित्येक चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.  शाहरुखने आजवर अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे त्याचा कलाविश्वात दरारा पाहायला मिळतो. मात्र, या सुपरस्टारला चक्क अभिनेत्री प्रिती झिंटाने सर्वांसमोर कानशिलात लगावली होती.

प्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख आणि तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला होता. कभी अलविदा ना कहना या सिनेमाच्या सेटवर प्रितीने शाहरुखला कानफटात मारली होती. विशेष म्हणजे कानशिलात लगावण्याचा किस्साही तितकाच रंजक आहे. २००६ मध्ये रिलीज झालेला करण जोहरचा कभी अलविदा ना कहना या सिनेमा सगळ्यांच्याच लक्षात असेल. या सिनेमात प्रिती, शाहरुख व्यतिरिक्त राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन ही स्टारकास्ट झळकली होती. 

प्रितीने लगावली किंग खानच्या कानशिलात 

''मी खरोखरच शाहरुखच्या कानशिलात लगावली होती. मी मुद्दाम त्याच्या कानशिलात लगावली नव्हती. तो सीनचा एक भाग होता. आणि सीन वास्तववादी वाटावा यासाठी शाहरुखनेच मला खरोखर कानशिलात लगावण्यासाठी सांगितलं होतं.''

पुढे ती म्हणते, ''हा हे खरं आहे मी त्याला मारलं. पण, मी अभिनय क्षेत्रात नवखी होते आणि कानशिलात मारायचा टायमिंग परफेक्ट कसा करावा हे मला कळत नव्हतं. त्यामुळे माझ्याकडून त्याला खरोखरच मारलं गेलं. पण, त्यानंतर मी पुन्हा अशी चूक कधीच केली नाही. कदाचित हे माझं फिल्मी कर्म आहे, ज्यामुळे अनेक सिनेमात मलाच वारंवार थोबाडात खावी लागते(प्रितीने हे हसून सांगितलं.)'' दरम्यान, प्रितीने १९९८ मध्ये दिल से या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातही तिने शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केली होती. 

टॅग्स :प्रीती झिंटाशाहरुख खानअमिताभ बच्चनसिनेमा