Join us

WHAT!! प्राजक्ता माळीला लागलेत डोहाळे, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:56 IST

Prajakta Mali: नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असते आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत येत असते. नुकतीच प्राजक्ता लंडनला तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. आता तिने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, परतल्यावर भूकेचे (तिखट, चमचमीत जेवणाचे) डोहाळे लागलेत….सध्या मी हे खातेय...(तरी भूकेच्या भरात सगळीकडे फोटोज् नाही काढले…) Diet गेलं तेल लावत… प्राजक्ता माळीच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या फोटोत प्राजक्ता हॉटेलमध्ये पावभाजी, अळूवडी, भजी आणि जेवणावर ताव मारताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे. कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला काही दिवसांपूर्वी आला. प्राजक्ताने नुकतेच एका आगामी मराठी चित्रपटाचं शूटिंग केले आहे. त्यासाठी ती लंडनला गेली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी