Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवावर विश्वास आहे का? प्राजक्ता माळीने एका शब्दात दिलं उत्तर, वाचा काय म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 09:43 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या 'फुलवंती' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. सध्या प्राजक्ता सिनेमाचं यश एन्जॉय करताना दिसतेय.  'फुलवंती'साठी धावपळ केल्यानंतर तिनं काही दिवस ब्रेक घेतला आणि तिचं आवडतं ठिकाण 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या बंगळुरू आश्रमात पोहचली. आश्रमातील फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

बंगळुरू आश्रमात आल्यावर प्राजक्ताने तिच्या मनातील भावना एका व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या. या व्हिडीओमध्ये 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या कोर्सबद्दल माहिती दिली. शिवाय, तिला बंगळुरू आश्रम किती आवडतो हेही तिने सांगितलं. प्राजक्ताने शेअर केलेला बंगळुरु आश्रमातील व्हिडीओ सध्या इंटरनेवर व्हायरल होत असून चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओवर एका चाहत्याने तिला देवासंदर्भात एक प्रश्न विचारला. त्याचं उत्तर प्राजक्ताने दिलं आहे. "तुझा देवावर विश्वास आहे का प्राजक्ता?" असं विचारलं. यावर तिने एका शब्दात 'होय' असं उत्तर दिलं.

 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या आश्रमात प्रजाक्ताची ही पहिलीच वेळ नाही.  तीन महिन्यातून एकदा काही गोष्टी करण्यासाठी ती आश्रमात जाते.  अभिनेत्री श्री श्री रविशंकर यांना आपला गुरू मानते. दरम्यान, प्राजक्ताचा 'फुलवंती' सिनेमा आता प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. तर आता प्राजक्ता पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटी