Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता मी स्वतःला "गुरुपूजा पंडित" म्हणू शकते का? प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 19:48 IST

प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. नुकतीच प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे. 

आर्ट ऑफ लिव्हींगच्या आश्रमात प्राजक्ता पोहोचली आहे. पोस्ट शेअर करत प्राजक्तानं कॅप्शन दिलं की, 'मी आता स्वतःला “गुरूपूजा पंडीत” म्हणु शकते का? काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला...तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते. ह्या course ला किती महत्व आहे, हे आर्ट ऑफ लिव्हिंग कुटुंब समजू शकेल. माझ्या आयुष्यात आणखी एका कामगिरीची नोंद'. यावेळी प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्समधले व्हिडीओ शेअर केले आहेत.

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, मालिका, चित्रपट, वेबसिरीज यात प्राजक्ताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमधील तिच्या लूकची बऱ्याचदा चर्चा होताना दिसत आहे.  प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम व्यावसायिकादेखील आहे. प्राजक्तराज हा तिचा स्वत:चा सोन्याच्या दागिण्यांचा ब्रँड आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतासेलिब्रिटी