Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळी शिवभक्तीत तल्लीन, अभिनेत्रीने घेतलं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 15:49 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतले आहे.

श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. हा महिना भगवान शंकराच्या पूजेसाठी सर्वोच्च मानला जातो. या महिन्यात प्रत्येक वाराला महत्त्व आहे. श्रावणात श्रावणी सोमवारला विशेष असे महत्त्व असते. त्यामुळे भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मंदिरात जातात. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतले आहे. 

प्राजक्ता माळीने नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील फोटो शेअर करत लिहिले की, त्र्यंबकेश्वर - नाशिक…१२ ज्योतिर्लिंगांची यात्रा करायचं ठरलंय. दुसरं ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण. आज श्रावण मासारंभ… पुढची यात्रा लवकर पुर्ण व्हावी हेच “देवादी देव - महादेवांकडे” प्रार्थना. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

प्राजक्ता माळी लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरून कलाविश्वात पदार्पण केलेल्या प्राजक्ताने अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'जुळून येती रेशीमगाठी', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. अभिनेत्री शिवाय प्राजक्ता ही एक  बिझनेसवुमनदेखील आहे. प्राजक्तराज नामक तिचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. तिच्या या पारंपारिक दागिन्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतो.  

टॅग्स :प्राजक्ता माळी