Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळीचं नवं पाऊल, वाचून तुम्हाला वाटेल तिचं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 06:30 IST

प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. प्राजक्ताने तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर केलेल्या पोस्टद्वारे ती लवकरच एका हिंदी शोमधून झळकणार असल्याचे जाहीर केले आहे. बाॅलीलॅण्ड्स.काॅम असे या शोचे नाव असून हा एक पर्यटन संबंधित कार्यक्रम असणाऱ आहे.

बाॅलीलॅण्ड्स.काॅम या कार्यक्रमाद्वारे युएईमध्ये चित्रीत झालेल्या हिंदी चित्रपटांच्या जागा, हॉटेल्स आणि समुद्र किनाऱ्याची सफर केली जाणार आहे. प्राजक्ता या शोची होस्ट असणार आहे. प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. याशिवाय यापूर्वी एका मराठी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. त्यामुळे, येत्या मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या या ट्रॅव्हेल शोद्वारे प्राजक्ता हिंदी प्रेक्षकांनादेखील आपल्यात खिळवून ठेवेल यात शंका नाही.

प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी