Join us
Daily Top 2Weekly Top 5

खिलाडी कुमार अक्षयमुळे वाचला होता 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा जीव, समुद्रात बुडता बुडता वाचली मिस युनिव्हर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 12:39 IST

अक्षय कुमार टॉप अ‍ॅक्शन स्टार्सपैकी एक आहे.

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. अक्षयने स्वबळावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.  अक्षय कुमार टॉप अ‍ॅक्शन स्टार्सपैकी एक आहे. अक्षय कुमार आतापर्यंत अनेक सिनेमात स्टंट करताना दिसला आहे.  खऱ्या आयुष्यातही कठीण वेळ आल्यास अक्षय  कधीही मागे हटला नाही. असाच एक किस्सा आहे, जेव्हा अक्षयने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लोकप्रिय अभिनेत्रीला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं होतं.

'अंदाज' या सिनेमादरम्यानचा एक किस्सा सर्वाधिक चर्चेत आला. सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीचा जीव अक्षयमुळे वाचला होता. ती अभिनेत्री म्हणजे लारा दत्ता ही आहे. २००० साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर लारा दत्ताने अक्षय कुमारसोबत 'अंदाज' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. या सिनेमात अक्षय आणि लारा यांच्यासह प्रियांका चोप्राही मुख्य भूमिकेत होती.  'अंदाज' चित्रपटातील एका गाण्याचं शूटिंग केपटाऊनमध्ये समुद्र किनारी झालं होतं.

शूटिंग दरम्यान एक जोराची लाट आली आणि लारा समुद्रात खेचली गेली. यावेळीती पाण्यात बुडणार तेवढ्यात अक्षयने उडी मारून तिचा जीव वाचवला. . अक्षय कुमारमुळे लारा दत्ता मरता-मरता वाचली होती. सिनेमाचे निर्माते सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीमध्ये ही घटना सांगितली होती. आज अक्षय कुमार ५६ वर्षांचा झाला असला तरी तरुणांना लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे. अक्षय अभिनयासोबतच फिटनेससाठी ओळखले जाते. अक्षय फिटनेस फ्रिक आणि शिस्तबद्ध आयुष्य जगतो.

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीलारा दत्ताबॉलिवूड