Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो, 'मिस कलरफूल'चा बिकिनी लूक होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 09:18 IST

दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

'मिस कलरफूल' म्हणून ओळखली जाणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. दोघांच्या  लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर विधिपूर्वक सत्यनारायणाची पूजा आणि मग सिद्धिविनायकाचं दर्शन घेत दोघांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. आता पुजा आणि सिद्धेश हनिमूनला गेले असून एकत्र वेळ घालवत आहेत. हनिमूनचे अनेक फोटोही पुजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

पुजा सावंतने तिच्या हनीमून डायरीतील सिद्धेश चव्हाणसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पुजा  बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने प्रिंटेड कलरफुल बिकिनी घातली असून त्यावर लीननचा व्हाईट शर्ट घातला आहे.  तिचा हा बिकिनी लुक खूपच स्टायलिश दिसून येत आहे.पूजाने आपल्या पतीसह समुद्राचा आनंद लुटला आहे. दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

पूजाने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाणबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने गुपचूप साखरपुडाही केला होता. आता सिद्धेशबरोबर लग्न करुन तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सिद्धेश हा डिस्नी कंपनीत कामाला आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. पूजाही काही काळासाठी त्याच्यासोबत तिकडे शिफ्ट होणार आहे.

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीमराठी अभिनेतालग्न