Join us
Daily Top 2Weekly Top 5

कतरिनासोबत फोटोत दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखा, हिचे वडील आहेत संभाजी मालिकेचे निर्माते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 17:08 IST

काही महिन्यांपूर्वीच या मराठी अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफसोबत फोटोत असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओखळलंत का? ही. आहे पूजा सावंत. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यात फोटोमध्ये तिच्यासोबत कतरिना कैफसुद्धा दिसतेय. दिवाळीच्या मुहूर्तावर दागिन्यांच्या जाहिरातीसाठीचे हे फोटोशूट आहे. काही तासांपूर्वीच टाकलेल्या या फोटोवर आतापर्यंत कमेंट्स आणि लाईक्स पाऊस पडला आहे. पूजाच्या फॅन्सनी जबरदस्त, क्युट अशा वेगवेगळ्या कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. 

काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. 

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच पूजाने दगडी चाळ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पूजाचे फॅन्स तिचा हा सिनेमा पाहण्यासाठी नक्कीच आतुर असतील यात काहीच शंका नाही. 

टॅग्स :पूजा सावंतकतरिना कैफ