Join us

पूजा हेगडेनं बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दलचं मोठं गुपित केलं उघड, ट्रोलिंग आणि PR गेमबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:27 IST

ट्रोलिंग आणि PR गेमबद्दल अभिनेत्रीनं मोठा खुलासा केलाय.

Pooja Hegde: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. पूजाचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. नुकतंच पूजा ही अभिनेता शाहिद कपूरसोबत 'देवा' चित्रपटात झळकली. या चित्रपटाचे प्रमोशन करताना पूजा दिसत आहे. आता नुकतंच एका मुलाखतीमध्ये पूजाने अत्यंत मोठा खुलासा केलाय.पूजाच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसत आहे.

पूजाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंग आणि  PR गेमबद्दल भाष्य केलं. कधी कोणाच्या पीआर गेममुळे लक्ष्य केलं गेलं आहे का? असा प्रश्न तिला मुलाखतीध्ये विचारण्यात आला होता. यावर पूजा म्हणाली,  "अनेक वेळा. जेव्हा मला ही गोष्ट कळाली, तेव्हा मला धक्का बसला. मी ज्या गोष्टीत खूप वाईट आहे, ती म्हणजे पीआर. मला आठवते की एक काळ असा होता, जेव्हा मीम पेजकडून मला सतत ट्रोल केलं जात होतं. तेव्हा मला प्रश्न पडायचा की ते माझ्याबद्दल सतत नकारात्मक गोष्टी का बोलत आहेत? मला लक्ष्य केल्यासारखं वाटायचं. पण, ते एक पेड ट्रोलिंग होतं.  लोक इतरांना खाली खेचण्यासाठी खूप पैसे खर्च करतात".

पूजा पुढे म्हणाली, "जेव्हा माझ्या टीमनं त्या मीम पेजशी संपर्क साधला. तेव्हा कळालं की कोणीतरी मला ट्रोल करण्यासाठी पैसे दिले होते. आम्ही त्यांना हे ट्रोलिंग थांबवण्यास सांगितलं. तेव्हा यासाठी त्यांनी पैसे लागतली म्हटलं. ते म्हणाले, जर तुम्हाला हे थांबवायचं असेल किंवा त्यांना परत ट्रोल करायचं असेल तर तुम्हाला इतके पैसे द्यावे लागतील. हे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारे होतं.  ट्रोलिंग आता फक्त विनोद किंवा छंद राहिलेला नाही तर तो एक व्यवसाय बनला आहे".

सोशल मीडियावर होणऱ्या ट्रोलिंगचा तिच्यावर आणि कुटुंबावर वाईट परिणाम झाल्याचं पूजाने सांगितलं. ती म्हणाली, "जेव्हा मला हे कळालं तेव्हा मी आणि माझं कुटुंबीय खूप अस्वस्थ झालो होते. पण मग मी ती गोष्ट कौतुक म्हणून घेतली. कारण जर कोणाला तुम्हाला खाली खेचण्याची गरज वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहात. कधीकधी मला काही वाईट कमेंट दिसतात आणि जेव्हा मी त्या प्रोफाइलवर जाते, तेव्हा मला कळतं की तिथे कोणताही डिस्प्ले पिक्चर किंवा कोणतीही पोस्ट नाही. हे फक्त पेड प्रोफाईल आहेत" 

टॅग्स :पूजा हेगडेबॉलिवूड