Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना-आलिया वादात पडू पाहणा-या रणदीप हुड्डाला पूजा भटचा टोला !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 11:18 IST

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील भांडणात काल रणदीप हुड्डाने उडी घेतली. रणदीपची ही प्रतिक्रिया कदाचित आलियाची बहीण पूजा भटला फार आवडली नाही.

ठळक मुद्देकंगनाच्या या टीकेवर अद्याप आलिया काहीही बोललेली नाही. पण तिच्यावतीने बोलणारे एक ना अनेक अचानक समोर येत आहेत. कदाचित पूजा भटला ही गोष्ट सर्वाधिक खटकली असावी.

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील भांडणात काल रणदीप हुड्डाने उडी घेतली. ‘प्रिय आलिया. मला आनंद वाटतो की, तू संधीसाधू कलाकारांच्या मतांना महत्त्व दिले नाहीस. शिवाय जुन्या ‘शिकारी’ कलाकारांच्या बोलण्याचा स्वत:च्या कामावर आणि स्वत:वर कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. स्वत: सतत पुढे नेण्याच्या तुझ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा’, असे ट्वीट रणदीपने केले. त्याने कंगनाचे नाव घेतले नाही. पण त्याचा इशारा कंगनाकडे होता, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही.पण रणदीपची ही प्रतिक्रिया कदाचित आलियाची बहीण पूजा भटला फार आवडली नाही. ‘आणि मग सह-कलाकार आणि कथित मित्रांच्या नावाखाली सांत्वना देण्यासाठी लोक पुढे येतात. या सगळ्या गोष्टी त्यांना कुठे घेऊन जातील, मला ठाऊक नाही. परमेश्वरा त्यांना माफ कर, ते काय बोलत आहेत, हे त्यांनाच ठाऊक नाही,’ असे ट्वीट पूजा भटने केले. पूजाचे हे ट्वीट रणदीपसाठी होते, हे समजायला फार उशीर लागला नाही.

गेल्या काही दिवसांपासून कंगनाने आलियाला लक्ष केले आहे. सर्वप्रथम कंगनाने तिच्या‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाला पाठींबा न दिल्याबद्दल आलियाला लक्ष्य केले. आलिया संधीसाधू स्वार्थी आहे, असे ती म्हणाली. यानंतर आलिया करण जोहरच्या हातातील कळसूत्री बाहुले आहे, अशी टीका तिने केली. ती इथेच थांबली नाही तर ‘गली बॉय’मधील आलियाचा अभिनय सुमार असल्याचे म्हणत तिने आलियावर निशाणा साधला.

कंगनाच्या या टीकेवर अद्याप आलिया काहीही बोललेली नाही. पण तिच्यावतीने बोलणारे एक ना अनेक अचानक समोर येत आहेत. कदाचित पूजा भटला ही गोष्ट सर्वाधिक खटकली असावी. शेवटी कितीही झाले तरी पूजाचा इंडस्ट्रीतील, इथल्या लोकांविषयीचा अनुभव मोठा आहे. कदाचित याच अनुभवातून ती बोलली असावी.

टॅग्स :पूजा भटआलिया भटकंगना राणौतरणदीप हुडा