Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता'; ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर पूजा भट्टने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:58 IST

Pooja bhatt: पूजाने पहिल्यांदाच तिच्या घटस्फोटाविषयी जाहीरपणे वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा भट्ट (pooja bhatt) सध्या बिग बॉस ओटीटी (Bigg boss OTT) मध्ये दिसून येत आहे. या शोमध्ये सहभागी झाल्यापासून पूजाने तिच्या प्रोफेशनलसह पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अलिकडेच तिने महेश भट्ट आणि सावत्र आई सोनी राजदान यांच्या नात्याविषयी भाष्य केलं होतं. त्यानंतर आता तिने तिच्या वैवाहिक जीवन आणि घटस्फोटाविषयी व्यक्त झाली आहे.

पूजाने अलिकडेच या कार्यक्रमात जिया शंकरसोबत बोलत असताना तिच्या घटस्फोटाविषयी भाष्य केलं. ११ वर्ष संसार केल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेणं हा किती मोठा आणि कठीण निर्णय होता यावर ती व्यक्त झाली.

 काय म्हणाली पूजा?

लग्नाच्या ११ वर्षानंतर मी माझ्या पतीला घटस्फोट दिला आणि तो पूर्णपणे माझा निर्णय होता. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी खोटं बोलू शकत नाही. पण, हे नातं कायम ठेवणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. माझी इच्छा नव्हती. मला माझं आयुष्य आरामात जगायचं आहे की १०-११ वर्षांचं जुनं नातं मला जपायचंय असा प्रश्न मी मलाच विचारला. माझा नवरा वाईट माणूस नाही. आमच्यात सगळं चांगलं सुरु होतं. पण, मला सतत असं वाटत होतं की मी स्वत:ला गमावलं आहे. आणि, हे असं होणं कोणासाठीच चांगलं नाही", असं पूजा म्हणाली.

'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

पुढे ती म्हणते, "मला स्वत:ला पुन्हा मिळवायचं होतं. घटस्फोटाचा निर्णय घेणं हा माझ्यासाठी सगळ्यात कठीण काळ होता." दरम्यान, सध्या पूजाने केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्या वैवाहिक जीवनाची चर्चा रंगली आहे. पूजा कायम तिच्या सोशल मीडियावरील पोस्टसह वादग्रस्त प्रकरणांमुळेही चर्चेत येत असते. 

टॅग्स :पूजा भटसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन