Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी कधीच विचार केला नव्हता की...", सुरुची अडारकरसाठी पती पियुषची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 13:25 IST

आज सुरुचीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पती आणि अभिनेता पियुष रानडेने खास पोस्ट लिहिली आहे.

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरूची अडारकर. टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा अशी तिची ओळख आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या सुरुचीला 'का रे दुरावा'मधील अदितीने लोकप्रियता मिळवून दिली. आज सुरुचीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पती आणि अभिनेता पियुष रानडेने खास पोस्ट लिहिली आहे. 

पियुषने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सुरुचीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने सुरुचीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. पियुष म्हणतो, "माझ्या अंधारलेल्या आयुष्यात तुझं प्रेम प्रकाशाप्रमाणे रस्ता दाखवतं. तू ज्याप्रकारे माझ्यावर प्रेम करतेस. मी कधी विचारच केला नव्हता की हे घडू शकतं. माझ्यावर इतकं प्रेम केल्याबद्दल थँक्यू. आपलं नातं ज्याप्रकारे दृढ होत आहे आणि प्रेम वाढत आहे, त्यासाठी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात वंडरफुल व्यक्तीला हॅपी बर्थडे. आय लव्ह यू". 

सुरुची आणि पियुषने डिसेंबर २०२३मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नाचा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पियुषचं हे तिसरं लग्न आहे. दरम्यान, सध्या पियुष 'काव्यांजली' मालिकेत काम करत आहे. तर सुरुची 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत झळकली होती.

टॅग्स :सुरुची आडारकरपियुष रानडेटिव्ही कलाकार